Sunday, May 31, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी; महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 2, 2025
in राष्ट्रीय
0
दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी; महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली | महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दि. 12 ते 14 डिसेंबर 2025 दरम्यान करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आणि सचिव आर विमला यांनी दिली.

कस्तुरबा मार्गांवरील महाराष्ट्र सदनात आयोजित या महोत्सवात महाराष्ट्राच्या विविध प्रादेशिक खाद्यसंस्कृतीचा आणि कलेचा संगम पाहायला मिळणार आहे.नवरसांनी पूर्ण अशा चवदार पदार्थांची रेलचेल दिल्लीकरांना या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे.

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते उद्घाटन

पाककृतींची मेजवानी

या खाद्य महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते होणार आहे. खाद्य महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ उपलब्ध असतील. नागपूर विभागातील सावजी चिकन किंवा मटण रस्सा, तार्री पोहा आणि संत्री-आधारित मिठाई; पुणे भागातील मिसळ पाव, वडा पाव आणि पुरण पोळी; जळगावातील शेव भाजी, भरित (वांग्याचे भरित) आणि केळीशी संबंधित पदार्थ; मालवणातील मालवणी सीफूड, कोंबडी वडे आणि सोल कढी; औरंगाबाद मधील नान कालिया, डालिंबी उसळ आणि स्थानिक बिर्याणी; तसेच कोल्हापुरी नॉन-व्हेजमधील तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि कोल्हापुरी चिकन किंवा मटण यांचा समावेश असेल. हे पदार्थ महाराष्ट्राच्या समृद्ध पाककृती परंपरेचे प्रतिनिधित्व करतील.

या खाद्य महोत्सवात सातारा, कोल्हापूर, जळगाव,पुणे अमरावती, रायगड या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतर्गत असलेले महिला स्वयंम सहायता समूह सहभागी होणार असून त्यांच्याकडील रुचकर पदार्थांचा देखील गरमागरम आस्वाद घेता येणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम आणि बालकांसाठी विशेष आकर्षण

हा महोत्सव केवळ खाद्यपदार्थांपुरता मर्यादित नसून, महाराष्ट्राची समृद्ध कला आणि संस्कृती दर्शवणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.लहान मुलांसाठी खास आकर्षण म्हणून ‘करमणूकीचे’चे खेळ आणि जादूचे विस्मयकारक प्रयोग ठेवण्यात आले आहेत. ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना या महोत्सवाचा आनंद घेता येईल.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ स्टॉलद्वारे पर्यटन स्थळांचे दर्शन

या महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (MTDC) विशेष माहिती स्टॉल देखील असणार आहे. या स्टॉलद्वारे महाराष्ट्रातील ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळांची माहिती देण्यात येईल. पर्यटन स्थळांच्या माहितीपत्रकांचे वितरण करून महाराष्ट्राच्या पर्यटनाला अधिकाधिक चालना देण्याचा मानस असल्याचे श्रीमती विमला यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राच्या अस्सल चवीचा संस्कृतीचा, पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी दिल्लीतील नागरिकांनी या तीन दिवसीय खाद्य महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीमती विमला यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मुक्ताईनगरमध्ये मतदानाच्या दिवशी रक्षा खडसेंचं रौद्ररुप ; नेमकं काय घडलं?

Next Post

जळगाव जिल्ह्यात रात्री उशिरापर्यंत ६५.५६ टक्के मतदान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव जिल्ह्यात ३,७७१ उमेदवार सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात ; नगराध्यक्ष, सदस्यपदासाठी किती अर्ज दाखल?

जळगाव जिल्ह्यात रात्री उशिरापर्यंत ६५.५६ टक्के मतदान

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता ;लाडकी बहीण योजनेवरून रोहिणी खडसेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

‘काम सरो वैद्य मरो’ सरकारचे धोरण; तब्बल ८० लाख लाडक्या बहिणींना अपात्र केल्याने रोहिणी खडसे संतप्त

May 31, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! येत्या १० दिवसांत कर्जमाफी; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

May 31, 2026

सरकारी नोकरीची मोठी संधी! UPSC कडून विविध मंत्रालयांमध्ये १९४ पदांसाठी भरती जाहीर

May 31, 2026
नवीन वर्षात या नियमांत होणार मोठा बदल; काय आहेत आताच जाणून घ्या..

१ जूनपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम; LPG सिलेंडर, विमान प्रवासासह ‘हे’ ६ मोठे बदल लागू!

May 31, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page