मुंबई । देशात नीट (NEET) आणि देशात युजीसी नेट परीक्षेत पेपरफूटी आणि मोठी गैरपैकार झाल्याचं समोर आलं होतं यात लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. संपूर्ण देशभरात छापे टाकण्यात आले त्याचं कनेक्शन महाराष्ट्रातही असल्याचं समोर आलं होतं. संसदेत आणि राज्याच्या विधानसभेत हा मुद्दा विरोधकांनी लावून धरला होता.
दरम्यान आज विधीमंडळाच्या पावसाठी अधिवेशनात पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक शंभूराज देसाई यांनी मांडलं. दोषी व्यक्तीला ३ ते १० वर्षांची शिक्षा तसंच १ कोटी रुपये दंडाची तरतूद या विधेयकात आहे. परीक्षतेली तोतयागिरी, फेरफारगिरीला बचक बसेल, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.















Discussion about this post