धुळे : रोजच्या स्वयंपाकात वापरण्यात येणाऱ्या लाल मसाल्यामध्ये हानिकारक रंग मिक्स करून बाजारात विक्री केली जात होती. सर्रासपणे हे काम केले जात असल्याबाबत पोलिसांना याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी कारवाई केली. यात मोठे रॅकेट असल्याचे समोर आले आहे.
स्वयंपाकात वापरण्यात येणाऱ्या मसाल्यांमध्ये अत्यंत हानिकारक आणि टॉक्सिक रंग व केमिकल्स वापरले जातात; अशी माहिती धुळ्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला प्राप्त झाली होती. यानंतर पथकाने एमआयडीसी मधील मसाले निर्मितीच्या कंपनीत छापेमारी केली आहे. यात पथकाने केलेल्या तपासात हा भेसळीचा प्रकार करण्यात मोठे रॅकेट असल्याचे समोर आले आहे.
धुळे एमआयडीसी मोहाडी येथे लाल मसाल्यामध्ये हानिकारक रंग आणि केमिकल्सच्या भेसळीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. यासंदर्भात दोघा संशयितांची चौकशी फूड अँड ड्रग्स विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. तसेच पुढील सर्व तपास करण्यात येत असून यासंदर्भात फूड अँड ड्रग्स विभागाचा पथकाने येथील नमुने देखील तपासणीसाठी घेतले आहेत. फूड अँड ड्रग्स विभागाच्या तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
Discussion about this post