नंदुरबार । नंदुरबार जिल्ह्यातून लाचखोरीची मोठी बातमी समोर आली आहे. अक्कलकुवा पंचायत समितीचा ग्रामसेवकासह खाजगी पंटरला सहा लाख 47 हजारांची रक्कम घेताना नंदुरबार एसीबीने अटक केली. ग्रामसेवक मनोज पावरा (दामोदर नगर, तळोदा) व खाजगी पंटर लालसिंग सीमजी वसावे (रा.गमण, ता.अक्कलकुवा, जि.नंदुरबार) असे लाचखोरांचे नाव असून या कारवाईने खळबळ उडाली.
37 वर्षीय तक्रारदार यांची पत्नी ग्रामपंचायत सिंदुरी, तालुका अक्कलकुवा येथे सन 2016 ते 2020 कालावधीत सरपंच होत्या. यानंतर ग्रामपंचायतीवर शासनाचे प्रशासक कार्यरत होते. या काळात ग्रामपंचायत सिंदुरी अंतर्गत मंजूर असलेले रस्ता काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक बसवणे अशी विविध आठ प्रकारची ग्रामपंचायतीला मंजूर असलेली कामे तक्रारदार व त्यांच्या इतर सहकार्यांनी पूर्ण केली.
नमूद कामे पूर्ण झाल्यानंतर कामांबाबतचे बिल 32 लाख 34 हजार ग्रामपंचायत सिंदुरीच्या बँक खात्यात शासनाकडुन आले. नमूद कामांच्या बिलाचे चेक देण्याच्या मोबदल्यात वरील नमूद आरोपी लोकसेवक व आरोपी खाजगी इसम यांनी 32 लाख 34 हजार रुपयांच्या वीस टक्के रक्कम म्हणजे सहा लाख 47 हजार रुपये लाचेची मागणी करीत लाच रक्कम रक्कम पंच व साक्षीदारां समक्ष स्वीकारताच दोघांना अटक करण्यात आली.















Discussion about this post