Wednesday, April 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार जाहीर ; वाचा कोण-कोणाला मिळाला पुरस्कार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 26, 2024
in महाराष्ट्र
0
महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार जाहीर ; वाचा कोण-कोणाला मिळाला पुरस्कार
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज रात्री उशीरा करण्यात आली. प्रसिध्द साहित्यिक होर्मुसजी कामा यांना (साहित्य व शिक्षण-पत्रकारिता) क्षेत्रात, अश्विन मेहता यांना (वैधक), ज्येष्ठ नेते राम नाईक यांना (सार्वजनिक सेवा), दिग्दर्शक राजदत्त आणि प्यारेलाल शर्मा यांना (कला) तर कुंदन व्यास यांना (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता) क्षेत्रात पद्म भूषण यांच्यासह महाराष्ट्रातील अन्य सहा मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणा-या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांमधे महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश
यात सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त उर्फ दत्तात्रय अंबादास मायाळू, ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, संगीतकार प्यारेलाल, हृदयरोग तज्ञ अश्विन मेहता, जन्मभूमी वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक कुंदन व्यास, जेष्ठ पत्रकार होर्मुसजी एन कामा यांचा समावेश आहे.

विविध क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
बालगृहाच्या माध्यमातून दिव्यांग आणि अनाथ मुलांचे आधारवड असलेले समाजकार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकर बाबा पुंडलीकराव पापळकर यांना सामाजिक कार्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पापळकर अनेक बालकांच्या जीवनाला आधार देत योग्य दिशा देण्याचे महत्वाचे कार्य केले आहे.

क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असून . जागतिक स्तरावर या खेळाला लोकप्रिय करण्यासाठी आणि अनेक मल्लखांपटू घडवण्यासाठी उदय देशपांडे यांनी अथक परिश्रम घेत मोठे योगदान दिले आहे 50 देशांतील 5,000 हून अधिक लोकांना वैयक्तिकरित्या प्रशिक्षित करून महिला, दिव्यांगजन, अनाथ, आदिवासी आणि ज्येष्ठ नागरिकांसह विविध गटांना त्यांनी मल्लखांबची ओळख करून दिली.

वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉ.मनोहर कृष्णा डोळे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. मनोहर डोळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून नेत्रसेवेमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे.नेत्र तपासणी शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी विनामूल्य नेत्रसेवा देत अमूल्य योगदान दिले आहे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी झहीर काझी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मेंदू रोग तज्ञ डॉ.चंद्रशेखर महादेवराव मेश्राम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरॉलॉजीचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. व्यवसायाने बँकर असलेल्या कल्पना मोरपारिया यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कल्पना यांनी अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर तसेच भारत सरकारच्या अनेक समित्यांवर देखील त्यांनी काम केले आहे.

बिहारचे माजी मुख्यमंत्री श्री कर्पूरी ठाकूर यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार (मरणोत्तर) नुकतेच जाहीर झाले आहे.या वर्षी एकूण 132 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये 05 पद्म विभूषण, 17 पद्म भूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कार सामील आहेत.

भारतरत्न नंतर भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ओळखल्या जाणार्याक पद्म पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताक दिनी 2024 रोजी करण्यात आली. 1954 मध्ये स्थापन करण्यात आलेले, हे पुरस्कार विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी व्यक्तींना ओळखतात. पद्म पुरस्कार 2024 विजेत्यांची यादी, दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला जाहीर केली जाते. यामध्ये कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान, अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग अशा विविध श्रेणींचा समावेश होतो.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मेथी आणि कोथिंबिरीला कवडीमोल भाव; हताश शेतकऱ्याने प्रजासत्ताक दिनी माल रस्त्यावर फेकला

Next Post

मराठा आंदोलनाला मोठं यश, सरकारने काढला जीआर? जरांगे करणार मोठी घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
एकदा आरक्षण मिळू दे, मग दाखवतो तुला ; बीडच्या सभेतून जरांगे पाटीलांचा इशारा कुणाला?

मराठा आंदोलनाला मोठं यश, सरकारने काढला जीआर? जरांगे करणार मोठी घोषणा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव पंचायत समितीत खासदार स्मिताताई वाघ यांची सविस्तर आढावा बैठक

जळगाव पंचायत समितीत खासदार स्मिताताई वाघ यांची सविस्तर आढावा बैठक

April 7, 2026
कृषि दिनानिमित्त जिल्हा परिषदेत कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव जिल्हा परिषदेच्या CEO मीनल करनवाल यांची बदली ; करिश्मा नायर नवीन CEO

April 7, 2026
जळगाव जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जळगाव जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
जळगाव जिल्ह्यात पोलिस पाटील कार्यशाळेला प्रचंड प्रतिसाद; विविध विभागांकडून मार्गदर्शन

जळगाव जिल्ह्यात पोलिस पाटील कार्यशाळेला प्रचंड प्रतिसाद; विविध विभागांकडून मार्गदर्शन

April 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page