यावल : यावल तालुक्यातील मनवेल गावात 25 वर्षीय पुष्पा जितेंद्र कोळी या विवाहित तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनात्रा संपविली. दरम्यान, आत्महत्यामागील कारण अद्यापही समोर आले नसून मयत तरुणीचा भाऊ देविदास जितेन्द्र कोळी यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉस्टेबल सिकंदर तडवी हे करीत आहे.
दरम्यान तरूणी मागील तीन वर्षापासून आपल्या पतीपासुन घटस्फोट घेऊन आपल्या माहेरी राहत असल्याची माहिती समोर आली आहे. तरूणीने केलेल्या आत्महत्या मुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
Discussion about this post