जळगाव : आम्हाला गद्दार म्हटलं गेलं असलं तरी आम्ही कोणतीही गद्दारी केली नाही. पक्षाचे विचार आम्ही सोडले नाहीत, पक्ष वाचवण्यासाठी आम्ही वेगळे झालो, बहुमताच्या आधारावर आमच्या बाजूने हा निकाल लागला अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांसारखे भूत आवरावे हाच असा सल्ला उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटलांनी दिला आहे. ते जळगावात बोलत होते.
एकनाथ खडसे यांनी घटनेतील त्रुटी शोधून हा निकाल दिला असल्याची प्रतिक्रिया दिली होती त्याला उत्तर देताना पाटील यांनी म्हटले आहे की, एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी पक्षाबाबत बोलण्याचा त्यांना कोणताच अधिकार नाही. राष्ट्रवादी पक्षाने त्यांना भरपूर दिले आहे.राष्ट्रवादी फुटणार नाही याची काळजी घ्यावी आणि राष्ट्रवादीबाबत चांगला विचार करावा. शिवसेनेनं जो पवित्रा घेतला आहे तोच पवित्रा अजित पवार यांनी घेतला आहे.















Discussion about this post