जळगाव : एक लाख रुपयाची लाच स्वीकारताना महावितरणच्या कंत्राटी वायरमनला जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री १० वाजता अटक केली. या कारवाई मोठी खळबळ उडाली.
प्रशांत विकास जगताप (वय ३३) असे लाचखोर वायरमनचे नाव असून याबाबत जळगांव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येत आहे
याबाबत सविस्तर असे की, जळगाव शहरातील ५३ वर्षीय तक्रारदाराने नवीन घस बांधकाम केलं असून या घराला वीज मीटर अर्ज केला होता. परंतु MSEB जळगांवच्या पथकाने तिथे भेट दिली असता त्यांना ४ लाख ६० हजार रुपये दंडाची रक्कम भरली तरच वीज मीटर कनेक्शन मिळेल असा निरोप कंत्राटी वायरमन यांनी दिला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी कंत्राटी वायरमन यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणी केली असता १ लाख ६० हजार रुपयांमध्ये प्रकरण मिटवतो असे सांगून लाचेची मागणी केली होती.
त्यानंतर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचा समक्ष पडताळणी केली असता कंत्राटी वायरमन यांनी तडजोडी अंती १ लाख ४० हजार रुपयांची मागणी करून पंचा समक्ष १ लाख रुपये आज रोजी स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. प्रशांत विकास जगताप (वय ३३) यांच्यावर जळगांव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येत आहे.















Discussion about this post