मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्यायचे नाही, या एकमेव अजेंड्यावर विरोधकांनी इंडिया आघाडीच्या नावाखाली एकजूट केली आहे. विरोधकांनी केलेल्या ‘इंडिया’ आघाडीत बरेच पक्ष सामील होत आहेत. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होण्याबाबत चर्चा सुरु आहे. अशातच वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपावर भाष्य केलं आहे. आजपर्यंत जागावाटप का केलं नाही, यांचं प्रामाणिक उत्तर त्यांनी जनतेला सांगावं. त्यांनी सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्यात, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
उद्या महाविकास आघाडीची दिल्लीत बैठक होणार आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. मला उद्याच्या बैठकीच आमंत्रण नाही. मला वर्तमानपत्रातून कळला आहे की उद्या बैठक आहे. मात्र आमंत्रण पाठवला आहे. अजून माझ्यापर्यंत आलं नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी बोलताना अकोल्याची लोकसभेची जागा वंचिने लढावी, असं म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावर आंबेडकरांनी भाष्य केलं आहे. सगळ्यांना माझी ऑफर आहे… आमच्यासाठी फक्त अकोला महत्वाचं नाही. अकोलाच काय उद्या पुण्यातही मी लढू शकतो, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.















Discussion about this post