जळगाव । जळगाव जिल्ह्यातील गंभीर गुन्हेगारांवर कारवाईचे सत्र सुरूच असून अशातच आणखी एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केलं. आकाश भास्कर विश्वे (वय ३४, रा. भगवा चौक सुप्रिम कॉलनी) असं या गुन्हेगाराचे नाव असून उपविभागीय अधिकाऱ्यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुप्रिम कॉलनीतील भगवा चौकातील सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश विश्वे हा परिसरात ठी दहशत माजवित होता. सन २०१४ पासून त्याच्यावर खूनाचा प्रयत्न, जबर दुखापतीसह आठ गंभीर गुन्हे दाखल आहे. त्याची गुन्हेगारीची दहशत बघता त्याला यापुर्वी सन २०१६ मध्ये एक वर्षासाठी हद्दपार केले होते. मात्र तरी देखील तो दहशत निर्माण करण्यासाठी गुन्हे करीत होता. त्याच्या गुन्हेगारीवृत्तीला आळा बसावा यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे आकाश विश्वे याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. तसेच हद्दपार आरोपीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोडण्यात आले आहे.
या पथकाची कारवाई !
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेड कॉन्सटेबल गणेश शिरसाळे, महिला पोलीस हेड कॉन्सटेबल निलोफर सैय्यद, पोलीस नाईक सचिन पाटील, योगेश बारी, साईनाथ मुंढे, नरेंद्र मोरे यांच्या पथकाने केली आहे















Discussion about this post