तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर, ही तुमच्या कामाची बातमी आहे. महाराष्ट्र कारागृह विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध संवर्गातील २०० हून अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून २१ जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीचे सर्व तपशील जाणून घेऊया
भरली जाणाऱ्या पदाचे नाव व पदसंख्या –
लिपिक – १२५ जागा
वरिष्ठ लिपिक – ३१ जागा
लघुलेखक निम्न श्रेणी – ०४ जागा
मिश्रक – २७ जागा
शिक्षक – १२ जागा
शिवणकाम निदेशक – १० जागा
सुतारकाम निदेशक – १० जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ०८ जागा
बेकरी निदेशक – ०४ जागा
ताणाकार – ०६ जागा
विणकाम निदेशक – ०२ जागा
चर्मकला निदेशक -०२ जागा
यंत्रनिदेशक – ०२ जागा
निटींग अँड विव्हिंग निदेशक – ०१ जागा
करवत्या – ०१ जागा
लोहारकाम निदेशक – ०१ जागा
कातारी – ०१ जागा
गृह पर्यवेक्षक – ०१ जागा
पंजा व गालीचा निदेशक – ०१ जागा
ब्रेललिपि निदेशक ०१ जागा
जोडारी – ०१ जागा
प्रिप्रेटरी – ०१ जागा
मिलींग पर्यवेक्षक ०१ जागा
शारिरिक कवायत निदेशक – ०१ जागा
शारिरिक शिक्षक निदेशक- ०१ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून त्याचे विस्तृत तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे
वयाची अट: 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आदुघ: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2024 (11:55 PM)















Discussion about this post