जळगाव : एकनाथ खडसेंनी उगाच तोंडाच्या वाफा सोडू नये मतदार संघात एकदा निवडून या. निवडणुका जवळ आहेत. एकनाथ खडसेंनी लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहावे; म्हणजे लोक तुम्हाला सांगतील अपयश कोणाचं आहे आणि यश कोणाचा आहे; अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे.
एकनाथ खडसे यांनी लोकसभेला उभा राहील असे म्हटले आहे. पण लोकसभेला एकनाथ खडसेंनी उभे राहावं आणि निवडून येऊन दाखवावं. माझा लोकसभा उमेदवारीचा कुठलाही विचार नाही आहे. माझी चर्चा तुम्हीच त्या ठिकाणी केली आहे. मी आमदार आहे आमदार म्हणूनच राहणार. पक्ष जो आदेश देईल, तो पालन करेल.
पक्षाने सांगितलं आमदारकीत नाही राहायचं तर मी दुसऱ्या कामात राहील परिवाराच्या कामा ठिकाणी मी जाईल. मला सत्तेची हाव नाही. इकडे पडलो की इकडे तिकडे चोऱ्यामाऱ्या कर. असा उद्योग मी करत नाही. मी संघाचा सेवक आहे व पक्षाचा शिलेदार आहे बाकी त्यांना त्यांचं लक लाभ; असेही महाजन म्हणाले.















Discussion about this post