१०वी/१२वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे. झारखंडच्या आरोग्य विभागामध्ये बंपर भरती होणार असून या संदर्भात स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे.
आरोग्य विभागात तब्बल 2532 कर्मचाऱ्यांची विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. ज्यामध्ये फार्मासिस्ट 560, लॅब टेक्नेशियन 636, एक्स रे टेक्नेशियन 116, परिचारिका 1173 आणि इतर 47 अशा एकूण 2532 पदांचा समावेश आहे.
या भरती प्रक्रियेला 23 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. इच्छूक उमेदवार आपला उमेदवारी अर्ज 26 फेब्रुवारीपर्यंत भरू शकतो. तर या पदांसाठी परीक्षा शुल्क जमा करण्यासाठी 26 फेब्रुवारीपर्यंत वेळ देण्यात आला आहे. तुम्हाला जर तुमच्या फॉर्ममध्ये काही बदल करायचा असेल तर त्यासाठी एक मार्चपर्यंत वेळ देण्यात आला आहे.
योग्यता
या प्रत्येक पदासाठी दहावी, बारावी पास तर काही पदांसाठी तांत्रिक शिक्षण आवश्यक आहे. शिक्षण आणि इतर पात्रतेबाबत झारखंड स्टाफ सिलेक्शनच्या वेबसाईटवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या पदांसाठी कमीत कमी वयोमर्यादा 18 तर जास्तीतजास्त 35 वर्ष इतकी आहे. ओबीसी प्रवर्गासाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची महिलांसाठी तीन वर्षांची तर एससी, एसटी प्रवर्गासाठी पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे.















Discussion about this post