मुंबई । मानवी जीवन, मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी, सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून यांनी पोलीस उप आयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी बृहन्मुंबई यांच्याद्वारे सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त अधिकारानुसार बृहन्मुंबई शहर हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.
या आदेशानुसार दि. 20 डिसेंबर 2023 अखेर पाच किंवा अधिक व्यक्तींच्या एकत्र येण्यास प्रतिबंध, मिरवणूक आणि मिरवणुकीत वाद्ये, बँड आणि फटाके वाजविणे इत्यादीस प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही, असे कळविण्यात आले आहे.
Discussion about this post