अन्न, नागरी पुरवठा व नागरी संरक्षण विभाग अंतर्गत पुरवठा निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. राज्यातील बेरोजगार युवकांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. या भरतीद्वारे ३४५ जागा भरल्या जाणार आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे. अन्न, नागरी पुरवठा व नागरी संरक्षण विभाग भरती २०२४ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
पुरवठा निरीक्षक (गट-क)
वरिष्ठ लिपिक (गट-क)
कोणत्या विभागात किती जागा :
कोकण – 47
पुणे – 82
नाशिक- 49
छत्रपती संभाजीनगर – 88
अमरावती – 35
नागपूर – 23
पात्रता :
पुरवठा निरीक्षक : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
परंतु पुरवठा निरीक्षक पदासाठी, “अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान” विषयामध्ये पदवी धारण करणा-या उमेदवारांना परिक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
उमेदवार प्रस्तुत परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरल्यास परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वरिष्ठ लिपिक: प्रस्तुत परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापुर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे. संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक हा शैक्षणिक अर्हता धारण केल्याचा दिनांक समजणेत येईल व त्या आधारे उमेदवाराची पात्रता ठरविणेत येईल.
वेतनश्रेणी :
पुरवठा निरीक्षक – S-१०: रु. २९२००-९२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
उच्चस्तर लिपिक – S-८ : रु. २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे.
मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.
अर्ज फी –
खुला/ ओबीसी – १००० रुपये.
मागासवर्गीय/ आदुघ/ दिव्यांग/ अनाथ – ९०० रुपये.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
जाहिरात पहा : PDF
Discussion about this post