पहूर : अपघाताची एक दुर्दैवी घटना जामनेर तालुक्यातील पहूरमधून समोर आली आहे. सायकलस्वार वडील आणि मुलीला आयशरने जोरदार धडक केली. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर वडील जखमी झाले. पहूर-छ.संभाजीनगर महामार्गावरील बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळ ही घटना घडली. याबाबत आयशर चालकविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
याबाबत सविस्तर असे की, पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक तथा पत्रकार शंकर भामरे हे सायकलने आपली मुलगी ज्ञानेश्वरी भामेरे हिस बस स्टॅन्ड वर घेऊन जात असताना मागून येणाऱ्या आयशर क्रमांक (एम. एच. २३ ऐ.यु ५५८२) या गाडीवरील चालक मद्यधुंद अवस्थेत असतांना जोरदार धडक दिली. त्यात शंकर भामरे व त्यांची मुलगी ज्ञानेश्वरी (वय११) रस्त्यावर फेकले गेले.
त्यात विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला असून, शंकर भामरे हे जखमी झाले आहे. शवविच्छेदन करून दुपारी एक वाजता शोकाकुल वातावरणात ज्ञानेश्वरी भामरे हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आयशर चालक सुनिल ग्यानदेव सोनवणे राहणार अंजनवटी तालुका जिल्हा बीड यास पहूर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.















Discussion about this post