जळगाव । धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी परप्रांतीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील म्हसावद गावाजवळील डाऊल रेल्वे लाईनवर घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील म्हसावद गावाच्या नजीक असलेल्या डाऊन रेल्वे लाईन वरील खंबा क्रमाक ४१५ जवळ एक ३० ते ३५ वर्षीय अनोळखी परप्रांतीय तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान हा तरूण धावत्या रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता उघडकीला आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पो.कॉ. प्रदीप पाटील, सुनिल राठोड, राहूल पवार, नितीन चिंचोरे यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला.
त्यानंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. त्याच्या खिश्यात बिहार ते मुंबई असे तिकिट आढळून आले असून मयत हा बिहार राज्यातील असून तो मुंबईवरून बिहार राज्यात घरी जात असल्याचे समजते. या घटनेबाबत बुधवार ७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ समाधान टहाकळे करीत आहे.
Discussion about this post