मुंबई । ऐन लग्नसराईच्या काळात सोन्यासह चांदीच्या किमतीने नवीन उच्चांक गाठला असून यामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. नोव्हेंबर महिन्यात सोन्या-चांदीच्या भावात वाढ झालेली पाहायाला मिळत असून या वाढीत तेजीचे सत्र डिसेंबर महिन्यातही पाहायला मिळाली.
झालेल्या दरवाढीने सोन्याच्या भावाने ६४ हजारांचा टप्पा ओलांडला होता. अशातच आज ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. २४ कॅरेटनुसार आज सोन्याच्या भावात हजार रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली. सणासुदीच्या काळात सोन्याच्या भावात पतझड पाहायला मिळाली. दिवाळीच्या काळात सोन्याचे दर नरमले होते. तर लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दागिन्यांना विशेष मागणी असते. या वर्षी सोन्याच्या दराने विक्रमी वाटचाल केली आहे. परंतु, आज सोन्यासह चांदीच्या भावात नरमाई पाहायला मिळाली.
गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,८०० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,२६० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीही (Price)घसरल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७८,५०० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)
प्रमुख शहरातील आजचा भाव किती?
मुंबई – ६३,११० रुपये
पुणे – ६३,११० रुपये
नागपूर – ६३,११० रुपये
नाशिक – ६३,१४० रुपये
ठाणे – ६३,११० रुपये
अमरावती – ६३,११० रुपये
जळगाव – ६४३००















Discussion about this post