धरणगाव । प.रा. हायस्कूल सोसायटीच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभागातर्फे दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. पंकज देशमुख हे अध्यक्षस्थानी होते. बाह्य परीक्षक प्रा. किशोर पाटील प्रा.सौदागर तसेच, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापित परीक्षा पथकातील डॉ. संजीव पगारे, डॉ. डी.के. भामरे, डॉ. एस. डी. वळवी यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रतिमेचे व संविधान उद्देशिकेचे पूजन करण्यात आले .
राज्यशास्त्र विभागाचे प्रा. मोहन लहासे यांनी उपस्थित प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांना संविधान दिनाची शपथ दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. मोहन लहासे, प्रा.योगेश पाटील. श्री. परेश पाटील, श्री. रितेश साळुंखे श्री. श्री. संजय तोडे,श्री. संजय नेटके, श्री. हेमंत गुरखा, श्री.मंगेश पाटील यांचे सहकार्य लाभले.















Discussion about this post