सावदा । रावेर येथून पुण्याला जाणार्या खासगी लक्झरी बसने अचानक पेट घेतल्याची घटना रावेर- सावदा (ता. रावेर) रस्त्यावर शनिवारी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने यात अनर्थ टळला असला तरी प्रवासातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
खासगी बस (क्र. एमएच ४० एन ५३६१) रावेरहून सायंकाळी ७ वाजता २० प्रवाशांना घेऊन पुण्याकडे निघाली. वाटेत वडगाव-वाघोदा (ता. रावेर) दरम्यान सुकी नदीच्या पुलाजवळ बसचे टायर फुटले. त्यामुळे बसने अचानक पेट घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
बसने पेट घेतल्याचे लक्षात येताच जीव वाचवण्यासाठी प्रवासी पटापट खाली उतरले. काहीजणांचे साहित्य बसमध्ये राहिल्याने ते आगीत खाक झाले. त्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सावदा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सपोनि जालिंदर पळे हे करीत आहेत. विशेष म्हणजे या बसमध्ये सावदा येथून काही प्रवासी बसणार होते. सावदा गाव येण्यापूर्वीच बसने पेट घेतला.















Discussion about this post