जळगाव । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी “राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याबाबत मोठा दावा केला. मंत्री अनिल पाटील हे पुन्हा विधानसभेवर निवडून आलेले दिसणार नाहीत; असा खळबळजनक दावा शरद पवार यांनी केला आहे.शरद पवार यांच्या दाव्यामुळे अजित पवार गटात मोठी खळबळ उडाली
“मी नुकताच अमळनेर विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला आहे. मतदार संघातील लोकांशी मी बोललो तेव्हा तेथील लोकांनी सांगितले की अनिल पाटील हे पुन्हा निवडून येणार नाहीत,” असे शरद पवार म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर प्रथमच शरद पवार माढ्यात दाखल झाले. पवारांनी माध्यमांशी चर्चा करताना विविध प्रश्नांना उत्तरं दिली. राज्यातील 48 जागांबाबत जागा वाटप बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. उरलेल्या जगांचाही निर्णय आता दिवाळीनंतर घेण्यात येईल, असे शरद पवारांनी स्पष्ट केलं.
दिवाळीनिमित्त गोविंदबागेत पवार कुटुंबियांनी एकत्र दिवाळी साजरी केली. अजित पवार हे पण उपस्थित होते. अजितदादा उपस्थिती राहणार की नाही, याबाबत चर्चा होती. “सत्तर वर्षांच्या परंपरेनुसार आम्ही दिवाळीला एकत्र येतो. दिवाळी सण हा आनंदाचा असतो. आनंदाच्या दिवसांमध्ये पवार कुटुंबीय एकत्र येत असते. आमची ही परंपरा गेल्या 70 वर्षांपासून सुरू आहे. आम्ही पवार कुटुंबीय कोणतेही राजकीय लवलेश न ठेवता कुटुंब म्हणून आम्ही एकत्र येत असतो. ही परंपरा ही आम्ही सर्वांनी कायम ठेवली आहे. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. त्याला कोणताही राजकीय लवलेश देखील नव्हता. आम्ही पवार कुटुंबीय दरवर्षी एकत्रित येतो,” असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी अजित पवारांच्या भेटीवर दिले.