Saturday, February 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शेतकऱ्याच्या कुटूंबाला सुरक्षा देणारी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 23, 2023
in जळगाव जिल्हा, सरकारी योजना
0
शेतकऱ्याच्या कुटूंबाला सुरक्षा देणारी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
बातमी शेअर करा..!

जळगाव : शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पुर, सर्पदंश, विंचुदंश, विजेचा शॉक बसणे, इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे अनेकदा शेतक-याचा मृत्यु ओढवतो किंवा काहीना अंपगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीच्या झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थीती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतक-यास/त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणुन नोंद नसलेल्या शेतक-यांच्या कोणत्याही एक सदस्य (आई, वडील, शेतकरीची पती, पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यांपैकी कोणतीही एक असे १० ते ७५ वर्ष वयोगटातील एकुण २ जणांकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. ही योजना १९ एप्रिल, २०२३ पासून आवश्यकतेनुसार प्रथम ३ वर्षे राबविण्यात येणार आहे. अशी माहिती संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

या योजनेच्या प्रयोजनार्थ कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या एक सदस्यांमध्ये आई वडील, शेतकरीची पती पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यांचा समावेश ग्राह्य धरण्यात येईल.

कृषि गणनेनुसार निर्धारीत केलेल्या वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणुन नोंद नसलेले शेतक-याच्या कुटुंबातील कोणत्याही १ सदस्य असे एकुण २ व्यक्तींकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो. अपघाती मृत्यु झाल्यास 2 लाख रुपये, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास 2 लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 2 लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा किंवा एक हात अथवा एक पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपये अनुज्ञेय असतील.

अपघातांचा समावेश असणा-या बाबी–
रस्ता/रेल्वे अपघात, पाण्यात बुडुन मृत्यु, जंतुनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडुन मृत्यु, खुन, उंचावरुन पडुन झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलवाद्यांकडुन झालेली हत्या, जनाव-यांच्या हल्यामुळे/चावण्यामुळे जखमी/मृत्यु, बाळांतपणातील मृत्यु, दंगल, अन्य कोणतेही अपघात या अपघातांचा समावेश असेल.

अपघातांचा समावेश नसणा-या बाबी-
नैसर्गिक मृत्यु, विमा कालावधीपुर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करुन घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करतांना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असतांना झालेला अपघात, भ्रमिष्ठपना, शरिरातंर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युध्द, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खुन या बाबींचा समावेश नाही.

लाभासाठी आवश्यक कागदपत्रे –

७/१२ उतारा, मृत्युचा दाखला, शेतक-यांचे वारस म्हणुन गावकामगार तलाठयाकडील गांव नमुना नं. ६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद., वारसदाराचे ओळखपत्र आधारकार्ड/पॅनकार्ड/बँक पासबुक/निवडणुक ओळखपत्र, अपघातग्रस्ताचा वयाचा दाखला, जन्मदाखला/शाळा सोडल्याचा दाखला/ शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र/ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र/आधार कार्ड/पॅन कार्ड/वाहन चालविण्याचा परवाना/पारपत्र/निवडणुक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र., प्रथम माहिती अहवाल/घटनास्थळ पंचनामा/पोलिसपाटील माहिती अहवाल., अपघाताच्या स्वरुपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे आवश्यक आहे.

जेव्हा शेतक-याचे अपघाताचे प्रकरण निदर्शनास येईल तेव्हा संबंधित अपघातग्रस्त शेतकरी/शेतक-यांचे वारसदार यांनी सर्व निर्धारीत कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचेकडे 30 दिवसाच्या आत सादर करावा. यासाठी कृषि विभागाच्या सर्व क्षेत्रिय अधिकारी/कर्मचारी यांचे मार्गदर्शन घ्यावे.

वारसदाराची निवड पध्दत-

अपघातग्रस्ताची पत्नी/अपघातग्रस्त स्त्रीचा पती, अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी, अपघातग्रस्ताची आई, अपघातग्रस्ताचा मुलगा, अपघातग्रस्ताचे वडील, अपघातग्रस्ताची सून, अन्य कायदेशीर वारसदार आदि प्रमाणे निवड करण्यात येईल. असे श्री. ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

बातमी शेअर करा..!
Previous Post

बोदवड येथे गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

Next Post

इतर मागासवर्गीय महामंडळाच्या कर्ज रक्कमेच्या थकीत व्याजावर 50 टक्के सवलतीस मुदतवाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
तुम्ही घरी किती रोख रक्कम ठेवू शकता? काय आहे आयकर नियम? तुम्हाला माहित असणे आवश्यक

इतर मागासवर्गीय महामंडळाच्या कर्ज रक्कमेच्या थकीत व्याजावर 50 टक्के सवलतीस मुदतवाढ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पंजाब नॅशनल बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी जम्बो भरती, पात्रता काय? किती पगार मिळेल? घ्या जाणून

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 5138 पदांसाठी भरती

February 21, 2026
अजित पवार यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावुक ; ट्विट करत म्हणाले,” ही बातमी ऐकून खूप”

त्या खटल्याप्रकरणी राहुल गांधींना मोठा दिलासा ! जामीनदार बदलला, भिवंडी न्यायालयात नेमकं काय घडलं?

February 21, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

February 21, 2026
१० कोटी दे, नाहीतर…’, बिश्नोई गँगकडून काँग्रेस आमदाराला जीवे मारण्याची धमकी!

१० कोटी दे, नाहीतर…’, बिश्नोई गँगकडून काँग्रेस आमदाराला जीवे मारण्याची धमकी!

February 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page