राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात विविध रिक्त पदांच्या 715 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 01 डिसेंबर 2023 पर्यंत होती. मात्र आता या मेगाभरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता सोमवार, ४ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ११:५५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज सादर करता येणार आहेत.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) लघुलेखक (निम्नश्रेणी)
2) लघुटंकलेखक
3) जवान राज्य उत्पादन शुल्क
4) जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क
5) चपराशी
भरतीसाठी आवश्यक पात्रता :
लघुलेखक (निम्नश्रेणी) – 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) लघुलेखन 100 श.प्र.मि. 03) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
लघुटंकलेखक – 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) लघुलेखन 80 श.प्र.मि. 03) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
जवान राज्य उत्पादन शुल्क – 10वी परीक्षा उत्तीर्ण
जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क – 01) 07वी परीक्षा उत्तीर्ण 02) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना 03) 03 वर्षे अनुभव
चपराशी – 10वी परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट : 30 एप्रिल 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
आवश्यक कागदपत्रे –
1. अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
2. वयाचा पुरावा
3. शैक्षणिक अर्हतेचा पुरावा
4. नावात बदल झाल्याचा पुरावा
5. मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे ज्ञान असल्याचा पुरावा
6. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन
7. वकिली व्यवसायाचा विहीत केलेला किमान अनुभव असल्याचा पुरावा.
वेतनमान ।
लघुलेखक (निम्नश्रेणी) – S-१५ : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
लघुटंकलेखक – S-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान, राज्य उत्पादन शुल्क- S-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क – S-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
चपराशी – S-१ : १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
Discussion about this post