नांदेड : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना पुन्हा डिवचले असून अजित दादा हे धूर्त राजकारणी आहेत. त्यांच्या पोटात एक आणि ओठावर एक असे विधान केले होते. यावर राज्याचे ग्रामीण विकास मंत्री महाजन यांनी प्रतिक्रिया दिली.
अजित दादा हे धूर्त राजकारणी आहेत, पोटात एक आणि ओठावर एक हे मला माहित नाही. परंतु दादा हे धूर्त राजकारणी आहेत; म्हणून तर ते इतके वर्ष राजकारणामध्ये टिकून आहेत; अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
आता सुद्धा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते बाहेर पडले. ५४ पैकी जवळपास ४२ आमदार त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे अजित पवार हे धूर्त राजकारणी आहेत, याबद्दल दुमत नाही अशी प्रतिक्रिया ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
दाखला खरा की खोटा तपासाचा भाग
शरद पवार यांचा दाखला खरा की खोटा हा संशोधनाचा विषय आहे. त्याबद्दल जास्त बोलणं संयुक्तिक वाटत नाही. परंतु त्यांचे म्हणणे आहे की हा दाखला खोटा आहे. जो मिळालेला दाखल खरा की खोटा हा तपासाचा भाग आहे. तपासल्यानंतरच कळेल अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.















Discussion about this post