जळगाव : जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी शेतामध्ये जबरी दरोडा टाकून शेत रखवालदाराचा डोक्यात लोखंडी वस्तू टाकून निर्घृण खून करून ट्रॅक्टर लांबविले आहे. ही घटना जळगाव तालुक्यातील पाचोरा रस्त्यावरील वावडदा शिवारात घडली.
याबाबत असे की, रखवालदार पांडुरंग पंडित पाटील (वय 52, बिलवाडी) हे बिलवाडी येथीलच रहिवासी ईश्वर मन्साराम पाटील यांचे वावडदा ते म्हसावद दरम्यान असणार्या शेतामध्ये रखवालदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मंगळवार 14 नोव्हेंबर रोजी ते शेतामध्ये रखवालदारी करण्यासाठी रात्री गेले असता मध्यरात्री दरोडेखोरांनी शेतात प्रवेश करीत रोटोव्हेटर व ट्रॅक्टर चोरी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर रखवालदार पांडुरंग पाटील यांनी विरोध केला व दरोडेखोरांनी डोक्यात लोखंडी वस्तू मारून त्यांचा खून केला.
दरोडेखोरांनी ट्रॅक्टरसह रोटाव्हेटर घेवून पळ काढला तर नंतर बुधवारी पहाटे सहा वाजता शेतमालक ईश्वर पाटील यांचा मुलगा राजेंद्र ईश्वर पाटील हा म्हशीचे दूध काढण्यासाठी शेतात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गावातील पोलीस पाटील सुवर्णा उंबरे आणि पोलिसांना याबाबत माहिती कळवल्यानंतर एमआयडीसी पोलिसांना माहिती कळवण्यात आली. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे व इतर पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.















Discussion about this post