जळगाव । भाजपने जळगाव लोकसभेचे माजी खासदार खासदार ए. टी. नाना पाटील यांना पाच वर्षानंतर पक्षात पुन्हा सक्रिय केलं असून त्यांच्यवर तेलंगणामधील दोन विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची जबाबदारी सोपविली आहे. यामुळे जळगावचेराजकीय गणित पुन्हा बदलण्याची शक्यता आहे.
भाजपचे माजी खासदार ए. टी. नाना पाटील जळगाव लोकसभा मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले होते. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर असताना त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं.मागील काही वर्षांपासून ए.टी. पाटील फारसे पक्षात सक्रीय दिसले नव्हते.
मात्र आता ते सक्रिय होऊ लागले आहेत. भाजपने तेलंगणा राज्य विधानसभा निवडणुकीत पक्षाचे प्रभारी म्हणून त्यांची पक्ष नेतृत्वाने नियक्ती केलीय. दोन जिल्हे आणि तीन विधानसभा क्षेत्राची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आलीय. मेहबूबाबाद जिल्ह्यातील डोनाकल विधानसभा मतदारसंघात त्यांनी उमेदवारांचा प्रचार केला.या
उमेदवारांसह प्रचाराचा फोटो आणि माहिती त्यांनी आपल्या फेसबुकवर टाकलीय.
माजी खासदार पाटील यांच्या सक्रीय होण्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय गणित बदलतील अशी शक्यता आहे. जळगाव लोकसभेचे भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार उन्मेष पाटील राहणार की पक्ष परत ए.टी. नाना पाटील यांना तिकीट देणार अशी चर्चा सुरू आहे.















Discussion about this post