सुरत । गेल्या दोन दिवसांपासून दिवाळी आणि छठला घरी जाणाऱ्यांची मोठी गर्दी स्टेशनवर पाहायला मिळत आहे. याच दरम्यान, गुजरातमधील येथे सुरत रेल्वे स्थानकावर बिहारकडे जाणारी ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांची एकच झुंबड उडाली आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरी होऊन एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अनेक जण पडून जखमीही झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरीदरम्यान अनेक जण पडून जखमीही झाले आहेत. मृत हा छपरा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. वीरेंद्र कुमार असे त्याचे नाव आहे. वीरेंद्र सुरतमध्ये नोकरीसाठी राहत होता. बेशुद्ध झाल्यानंतर त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. चेंगराचेंगरीत अनेक प्रवासी बेशुद्ध पडले आणि त्यांना तेथे उपस्थित आरपीएफ अधिकाऱ्यांनी सीपीआर देऊन वाचवले, असं सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी ताप्ती गंगा एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी गर्दी केली होती, त्यावेळीच स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली. यात तीन ते चार जण बेशुद्ध पडले. वीरेंद्र कुमार हे देखील त्यापैकीच एक होते. सर्वांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी वीरेंद्रला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे खरे कारण समजेल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.















Discussion about this post