मुंबई । आज देशभर धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी सोनं खरेदीला विशेष महत्त्व असून यादिवशी ग्राहक सोन्या-चांदीच्या खरेदीला प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही आज सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ४०० रुपयांनी घसरला तर चांदीच्या दरातही प्रतिकिलो ३०० रुपयांची घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. आज २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,७०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २५ कॅरेट सोन्याचा दर ६०,७६० रुपये प्रति १० ग्रॅम असून चांदीचा दर ७३,२०० रुपये प्रति किलो आहे. लक्षात घ्या की सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा कमी झाला तर चांदीच्या दरातही दिलासा मिळाला आहे.
११ मे २०२३ रोजी सोन्याने ६१,५८५ रुपये प्रति १० ग्रॅमची सर्वकालीन उच्चांकी पातळी गाठली होती. तसेच ४ मे २०२३ रोजी चांदीचा भाव ७६,४६४ रुपये प्रति किलोच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता.















Discussion about this post