मुंबई । ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सुषमा अंधारे यांनी या ट्विटवरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.
नेमकं काय आहे व्हिडिओमध्ये
या व्हिडीओत पोलिसांची एक गाडी दिसत आहे. या गाडीत कैद्यांना काहीतरी पाकिटे दिली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. सुषमा अंधारे यांनी या व्हिडीओवरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. कोर्टातून येरवडा कारागृहात कैद्यांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीत कैद्यांना पाकिटे वाटल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. “उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली. पुन्हा एकदा गृहकात्याची अब्रू चव्हाट्यावर आली”, असं म्हणत सुषमा अंधारे यांची फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. हा व्हिडिओ पुण्यातील जेल रोडचा आहे, असं सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलंय.
उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली.. पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली..
कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगुज की देवघेव? मग हळूच निर्जन स्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकीट पुरवली जात आहेत? स्थळ: पुणे जेल रोड @Dev_Fadnavis @ShivsenaUBTComm pic.twitter.com/kJpnRhBJSl— SushmaTai Andhare (@andharesushama) November 9, 2023
“कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगुज की देवघेव? मग हळूच निर्जनस्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकीट पुरवली जात आहेत?”, असा सवाल सुषमा अंधारे यांनी ट्विटमध्ये केलाय.















Discussion about this post