मुंबई । गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्यांनतर त्यांना तातडीने जळगावमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारांसाठी त्यांना एअर अॅम्ब्युलन्समधून मुंबईत आणण्यात आले. सध्या त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांनी आपल्या प्रकृतीविषयी हॉस्पिटलमधूनच माहिती दिली आहे.
सध्या त्यांची प्रकृती ठणठणीत असून, लवकरच सेवेत रुजू होईल, असे त्यांनी समर्थकांना आणि हितचिंतकांना सांगितले. एकनाथ खडसे यांच्या एक्स अकाउंटवरून प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. ”मध्यंतरी मला हृदयविकाराचा त्रास झाला. मात्र आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझी तब्येत आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल,’ असं त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.
प्रसंग कोणताही असो, आपण माझ्या पाठिशी उभे राहता. आपले हेच सदिच्छांचे पाठबळ मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते. आपणा सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ! महाराष्ट्रातील सर्व नागरिक बंधू-भगिनींना दिपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!, असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.















Discussion about this post