एका मल्याळम टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्रीचा घरात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रंजूषा मेनन असं या अभिनेत्रीचं नाव असून घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
30 ऑक्टोबर रोजी सकाळी रंजूषाचा मृत्यू झाला असून आता त्याची माहिती समोर आली आहे. रंजूषाच्या मृत्यूची बातमी ऐकून तिच्या चाहत्यांना आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या मृत्यूमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पण इतक्या कमी वयात तिचा मृत्यू झाल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.
रंजूषा मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. तिने अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये दमदार सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. ती शेवटी ‘आनंदरागम’मध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. सिटकॉम वरण डॉक्टरनूमध्ये तिने विनोदी भूमिका साकारली होती. ‘एंटे माथावू’ आणि ‘मिसेस हिटलर’ यांसारख्या चित्रपटांतील तिच्या भूमिकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.















Discussion about this post