मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एरणीवर आला असून मनोज जरांगे पाटील यांच्यासह गावागावातील मराठा समाजाने उपोषण सुरू केलं आहे. यामुळे अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलनसह कँडल मार्च निघत आहेत.दरम्यान, मराठ आंदोलन उग्र होत असतानाच आता यात प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज (इंदूरीकर) यांनी उडी घेतली असून आजवरचा सर्वात मोठा निर्णय जाहीर केला आहे.
निवृत्ती महाराज (इंदूरीकर) यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. इंदुरीकर महाराज यांनी उद्यापासून 5 दिवस कोणतेही कार्यक्रम न करण्याचा आणि कीर्तन न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून इंदुरीकर महाराज यांनी हा निर्णय घेतला असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
त्यामुळे इंदुरीकर महाराज यांचे उद्यापासून ते पाच दिवसापर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द झाले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, इंदुरीकर महाराज हे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी जालन्याला जाणार की नाही याबाबतची माहिती कळू शकलेली नाही.