जळगाव । आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी जळगाव ग्रामीण मतदार संघात शिंदे गटाला धक्का बसला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या भोलाणे व धानोरा येथील समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
पाणीपुरवठा मंत्री असून पाण्याची समस्या त्यांच्याने सोडवली जात नाही. भाषणे करायची आणि लोकांची वाहवा मिळवायचे काम मंत्री पाटील करत असल्याची भावना यावेळी पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक योगराज सपकाळे, जिल्हा सहकार विभाग जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, धानवड येथील दिलीप चव्हाण तसेच धानोरा व भोलाणे येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांनी केला पक्षप्रवेश
धानोरा खुर्द व भोलाणे येथील कार्यकर्त्यांचा माजी पालकमंत्री गुलाबरावजी देवकर यांच्या हस्ते राष्ट्रवादीचा रुमाल गळ्यात घालून जाहीर प्रवेश केला. गुलाबराव पाटील यांचे खंदे समर्थक मानले जाणारे प्रकाश भागवत पाटील व त्यांच्या समर्थकांनी देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. धानोरा खुर्द येथील बाळू सदाशिव कोळी, समाधान रामचंद्र कोळी, शंकर आनंदा कोळी, आकाश रामकृष्ण कोळी, भरत कोळी, प्रकाश धोंडू कोळी, रामकृष्ण ज्ञानेश्वर कोळी, पंढरी बाबुलाल कोळी, दिगंबर पांडुरंग कोळी, विलास तुळशीराम कोळी, विष्णू किशोर कोळी, सोमनाथ तुळशीराम कोळी, भूषण युवराज कोळी, कृष्णा अरुण कोळी, हेमंत श्रीराम कोळी, शत्रुघ्न अरुण कोळी, दीपक हिरालाल कोळी, श्रीराम हिरालाल कोळी, संजय भिकारी कोळी, रामकृष्ण सोमा कोळी, संजय भास्कर कोळी, भावडू हिरालाल कोळी, रुपेश समाधान कोळी, विजय वसंत कोळी, सुनील पितांबर कोळी, पिंटू कडू कोळी, निवृत्ती मधुकर कोळी, जगदीश कडू कोळी, नारायण शांताराम कोळी, भगवान दामू कोळी, दुर्योधन कडू कोळी, सुखदेव कडू कोळी सर्व रा. भोलाणे यांनी प्रवेश केला. जितेंद्र शालिक पाटील,राजेंद्र भगवान सोनवणे, गणेश रूपचंद सोनवणे, विशाल नथू कोळी, पारस ईश्वर साळुंखे, प्रवीण प्रल्हाद सोनवणे, संदीप मच्छिंद्र सोनवणे, स्वप्निल देविदास सोनवणे, पंकज राजेंद्र सोनवणे, हेमराज दत्तू साळुंखे, नवलकिसन सोनवणे, नवल गोपीचंद सोनवणे, रामचंद्र गोकुळ कोळी, विलास नारायण सोनवणे, प्रकाश विष्णू सोनवणे, शिवाजी नामदेव सोनवणे, राजेंद्र भागवत पाटील योगेश अर्जुन सोनवणे, गुरुदास लकीचंद भिल,रवींद्र तुकाराम भिल, अजय सुकलाल कोळी, दिनेश आत्माराम सोनवणे, विकास शालिक पाटील, नरेंद्र अर्जुन कोळी, सुशील राजेंद्र पाटील यांनी जाहीर पक्षप्रवेश केला.















Discussion about this post