धरणगाव । रस्ता ओलांडत असतांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ७० वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. ही घटना धरणगाव तालुक्यातील पाळधी गावानजीकच्या खेडी कढोली फाट्याजवळ घडली. मधुकर कडून फुलपगार असे मयत वृध्दाचे नाव आहे.
याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मधुकर फुलपगार हे आपल्या परिवारासह पाळधी गावात वास्तव्याला होते. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. १३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता खेडी कढोली फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असतांना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.
या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान अखेर महिन्याभरानंतर गुरूवारी १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांची पत्नी सुमनबाई मधुकर फुलपगार यांनी पाळधी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालक विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उमेश भालेराव करीत आहे















Discussion about this post