Saturday, February 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा ‘या’बाबत राज्यात ठरला पहिला जिल्हा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 13, 2023
in जळगाव जिल्हा
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
बातमी शेअर करा..!

जळगाव |  जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत अर्थसंकल्पीय प्राप्त ३६३.१८ कोटी रूपये निधीमधून ११३.४९ कोटी रूपये निधी  वितरीत झालेला आहे. प्राप्त निधीशी वितरीत निधीची टक्केवारी ३१.२५ असून निधी वितरणामध्ये जळगाव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांक आहे. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा , ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या सूचना, लोकप्रतिनिधींचे सहकार्य, जिल्हा नियोजन समिती कार्यालय, जिल्हा नियोजन समितीच्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणेच्या उत्कृष्ट कामामुळे निधी वितरणात जिल्हा राज्यात प्रथम आहे‌.

बऱ्याच योजनांतर्गत प्रशासकीय मान्यता पूर्ण झालेल्या आहेत. प्रशासकीय मान्यता मिळालेल्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करावेत. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिल्या. जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ खर्चाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अल्पबचत भवन येथे आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, यावल आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार तसेच कार्यान्वयीन यंत्रणांचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपयोजना व आदिवासी घटक कार्यक्रम योजनांचा आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी श्री प्रसाद म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ अंतर्गत जिल्हा परिषदेच्या कामांना अद्याप कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाहीत. अशा कामांना १८ ऑक्टोंबर पर्यंत कार्यारंभ आदेश देण्यात येतील.असे मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आश्वस्त केले आहे. २०२३-२४ अंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या कामांना कार्यारंभ आदेश देण्याची ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत कार्यवाही पूर्ण करुन २५ लाखांपेक्षा कमी किंमतीची कामे डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करणेबाबत निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांना यावेळी दिले.

एकदा कामे मंजूर झाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेशिवाय कोणत्याही कामांमध्ये बदल करु नयेत. त्याचप्रमाणे राज्यस्तरावर प्रलंबित विषयांच्या अनुषंगाने काही पाठपुरावा आवश्यक असल्यास त्याबाबतही प्रत्यक्ष पाठपुरावा करण्यात येईल‌. असे ही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.‌ सर्व विभागांनी प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्रे महालेखापाल विभागास सादर करावीत, तसेच मागील आर्थिक वर्षातील मंजूर कामांना आवश्यक निधी मागणी पुढील आठवड्यात सादर करावीत याबाबत सर्व कार्यान्वयीन यंत्रणांना सूचित करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मंजूर कामांची शासकीय तंत्रनिकेतन मार्फत त्रयस्थ  तपासणी करण्यात येणार असून यामध्ये सामाजिक लेखापरीक्षण (Social Audit),  वित्तीय लेखापरीक्षण (Financial Audit) व तांत्रिक लेखापरीक्षण (Technical Audit) होणार आहे. सदर अहवाल जिल्हा नियोजन समिती समोर ठेवण्यात येईल त्यानुषंगाने सर्व कामे गुणवत्तापुर्ण करावीत असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

बैठकीत नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत मदर मिल्क बँक तयार करणे, प्रोटीन पावडर इ. प्रस्तावांबाबत चर्चा झाली. पाळधी येथे पोलिस स्टेशन बांधकामाचा प्रस्ताव व महिला व बाल विकास भवन बांधकाम प्रस्ताव ८ दिवसांमध्ये सादर करणेबाबत जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास सूचना दिल्या.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भावाला दुकानावर पाठवून घरी एकटी असलेल्या बहिणीचं धक्कादायक पाऊल ; जळगावातील घटना

Next Post

उद्योजकांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा – खासदार उन्मेष पाटील

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
उद्योजकांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा – खासदार उन्मेष पाटील

उद्योजकांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा - खासदार उन्मेष पाटील

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

February 21, 2026
रेल्वे प्रवाशांचे साहित्य लांबवणारा सराईत चोरटा जाळ्यात ; ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

रेल्वे प्रवाशांचे साहित्य लांबवणारा सराईत चोरटा जाळ्यात ; ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 21, 2026
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

February 21, 2026
एसटी भाडेवाढीबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट

एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज ! वेतन वाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा होणार

February 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page