यावल : यावल तालुक्यातील एका गावातील शेतकऱ्याच्या नावाने बनावट इंस्टाग्रामचे खाते तयार करून त्यावर सदर शेतकरी व त्याच्या मुलीची बदनामी कारक पोस्ट करीत बदनामी करण्यात आली. हा प्रकार संबंधित शेतकर्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अनोळखी व्यक्तीविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यावल तालुक्यातील येथील एका 40 वर्षीय शेतकर्याचे इंस्टाग्रामचे खाते आहे. हे सोशल नेटवर्कचे खाते कोणीतरी हॅक केले आणि या खात्यावरूनच शेतकर्याच्या मुलीची बदनामीकारक पोस्ट अज्ञाताने व्हायरल केली. हा प्रकार निदर्शनास येतात 40 वर्षीय शेतकर्याने जळगाव येथील सायबर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.















Discussion about this post