Monday, February 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

युवारंगचे विजेतेपद मू.जे. महाविद्यालयाला तर प्रताप महाविद्यालय उपविजेता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 11, 2023
in जळगाव जिल्हा
0
युवारंगचे विजेतेपद मू.जे. महाविद्यालयाला तर प्रताप महाविद्यालय उपविजेता
बातमी शेअर करा..!

जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि के.सी.ई. संस्थेचे मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवारंग युवक महोत्सवात जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. तर प्रताप महाविद्यालय, अमळनेरचा संघ उपविजेता ठरला. बुधवार दि. ११ ऑक्टोबर रोजी महोत्सवाचा समारोप मोठ्या जल्लोषात झाला.

दि.७ ते ११ ऑक्टोबर दरम्यान जळगाव येथील मू.जे. महाविद्यालयात युवारंग युवक महोत्सव झाला. बुधवारी सिने कलावंत सुरभी हांडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. यावेळी बोलतांना सुरभि हांडे यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. विविध प्रश्नांना उत्तरे देतांना त्या म्हणाल्या की, आयुष्यात खुपदा संधी प्राप्त होत असते. नेमकी संधी कोणती हे कळायला हवे. स्वत:शी स्पर्धा करा. आज केलेल्या अभिनयापेक्षा अजून काय उत्तम करता येईल याचा मी विचार करत असते. लहान गावातून मुंबईत गेल्यानंतर करीअर करतांना पुन्हा गावाकडे परतायचे नाही हे डोक्यात ठेवा. स्पर्धेतील सहभागामुळे आत्मविश्वास वाढतो. सोशल मिडीयाचा फायदा तरूण पिढीला होत आहे. मी मूळजी जेठा महाविद्यालयात शिकत असतांना शिक्षकांकडून खूप काही शिकले. त्याच महाविद्यालयात माझे कौतुक होत आहे याचा खुप आनंद आहे असे त्या म्हणाल्या.

आ. सुरेश भोळे यांनी महाविद्यालयात शिकतांना उत्तम गुण घेवून पदवी प्राप्त करा आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा. मात्र स्वत:मधील कलेचा विकास करा. शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांचा आदर्श घ्यावा. इच्छाशक्ती असेल तर यश गाठता येथे असे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी या महोत्सवात तरूणांनी सादर केलेले कलाविष्कार बघता ही पिढी विचार करणारी आणि व्यक्त होणारी आहे. असे सांगून यश अपयशाची पर्वा न करता स्पर्धांमध्ये सहभागी होत रहा असे आवाहन केले. स्वागताध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी स्वयंशिस्त महत्वाची असून वेळेचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले. संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी महोत्सवाचा आढावा घेतांना या महोत्सवात ११८९ सहभागी विद्यार्थ्यांपैकी ४७५ विद्यार्थी व ७१३ विद्यार्थिंनींचा सहभाग होता असे सांगितले.

यावेळी संघ व्यवस्थापकांच्या वतीने डॉ. नलिनी पाटील, प्रा. अजबराव इंगळे, प्रा. सरीता पाडवी, विद्यार्थी कलावंतांच्या वतीने सायली महाजन, अपुर्वा शहा, धर्मेश हिरे व क्रांती मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेतील कलावंत व मु.जे. महाविद्यालयातील प्रा. हेमंत पाटील यांचा प्र-कुलगुरुंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. भाग्यश्री भलवतकर व प्रा. योगेश महाले यांनी केले. समन्वयक प्रा. जुगलकिशोर दुबे यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास अधिसभा सदस्य प्राचार्य के.बी. पाटील, प्राचार्य सुनील पाटील, प्राचार्य सुनील पवार, प्रा. पदमाकर पाटील, प्रा. संदीप नेरकर, प्रा. गजानन पाटील, प्रा. जयवंत मगर, प्रा. अजय पाटील, अमोल मराठे, सुनील निकम, अमोल सोनवणे, दिनेश चव्हाण, स्वप्नाली महाजन, नितीन ठाकूर, भानुदास येवलेकर, नेहा जोशी, दीपक पाटील, डॉ. ऋषिकेश चित्तम, डॉ. संजय पाटील, प्रा. मंदा गावित, यांच्यासह विद्या परिषदेचे व विविध प्राधिकरणाचे सदस्य व प्राचार्य गौरी राणे, प्राचार्य अनिल पाटील, प्राचार्य एस.आर. पाटील, संघ व्यवस्थापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध समिती सदस्य्, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

युवारंग स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:-
१) संगीत विभाग
शास्त्रीय वादन(स्वरवाद्य):- मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (द्वितीय), पु.ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ (तृतीय)
शास्त्रीय वादन (तालवाद्य):- प्रताप महाविद्यालय, अमळनेर (प्रथम), मु.जे.महाविद्यालय,जळगाव (द्वितीय), महात्मा गांधी शि.मंचे कला, वाणिज्य विज्ञान महा., चोपडा (तृतीय)
शास्त्रीय गायन:- मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), , प्रताप महाविद्यालय, अमळनेर (द्वितीय) , पु.ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ (द्वितीय)
लोकसंगीत (वाद्यवृंद):- महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (प्रथम), मु.जे.महाविद्यालय,जळगाव (द्वितीय), प्रताप महाविद्यालय,अमळनेर (तृतीय)
समुह गायन (भारतीय):- मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (व्दितीय), प्रताप महाविद्यालय,अमळनेर (तृतीय)
सुगम गायन (भारतीय):- प्रताप महाविद्यालय,अमळनेर (प्रथम), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (द्वितीय), पु.ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ (तृतीय)
नाट्य संगीत:- प्रताप महाविद्यालय, अमळनेर (प्रथम), पु.ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ (द्वितीय), मु.जे.महाविद्यालय,जळगाव (तृतीय)
समुह गायन (पाश्चिमात्य):- मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), महात्मा गांधी शि.मंचे कला, वाणिज्य विज्ञान महा., चोपडा (द्वितीय), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (तृतीय)
पाश्चिमात्य वाद्यसंगीत:- महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (प्रथम), मु.जे.महाविद्यालय,जळगाव (द्वितीय), पु.ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ मु.जे.महाविद्यालय (तृतीय)
पाश्चिमात्य गायन :- महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (प्रथम), प्रताप महाविद्यालय,अमळनेर (द्वितीय), मु.जे.महाविद्यालय,जळगाव (तृतीय)

२) नृत्य विभाग
­­­­शास्त्रीय नृत्य:- प्रताप महाविद्यालय, अमळनेर (प्रथम), मु.जे.महाविद्यालय,जळगाव (द्वितीय), आर.सी.पटेल इन्स्टीटयुट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट,शिरपूर (जि. धुळे) (तृतीय)
समुह लोकनृत्य:- मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (द्वितीय), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (तृतीय)

३) वाड्मयीन (साहित्य) कला
वादविवाद:- विद्यावर्धिनी महाविद्यालय,धुळे (प्रथम), पु.ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ (द्वितीय), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (तृतीय)
वक्तृत्व:- विद्यावर्धिनी महाविद्यालय,धुळे (प्रथम), पु.ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ (द्वितीय), आर.सी.पटेल इन्स्टीटयुट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट,शिरपूर (जि. धुळे) (तृतीय)

४) रंगमंचीय कला प्रकार (नाट्य कला )
मुकअभिनय:- मु.जे.महाविद्यालय, जळगाव (प्रथम), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (व्दितीय), पू.सा.गु.वि.प्र.मंडळाचे फार्मसी महाविद्यालय, शहादा (तृतीय)
मिमिक्री:- मु.जे.महाविद्यालय, जळगाव (प्रथम), चोपडा एज्‍युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ एज्युकेशन, चोपडा (द्वितीय), कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव (तृतीय)
प्रहसन:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे (नकाणे),धुळे (प्रथम), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (व्दितीय), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (तृतीय)

५) ललित कला
1. व्यंगचित्र:- मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), ए.आर.बी. गरूड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शेंदुर्णी (व्दितीय), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (तृतीय)

2. क्ले मॉडेलिंग:- मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), गजमल तुळशीराम पाटील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, नंदुरबार (द्वितीय), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (तृतीय)

3. कोलाज:- मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव (द्वितीय), एस.एस.व्ही.पी.एस.चे भाऊसाहेब एन.एस. पाटील आर्टस् आणि एम.एफ.एम.ए. कॉमर्स कॉलेज, धुळे (तृतीय)

4. इन्स्टॉलेशन:- बी.पी.आर्टस, एसएमए सायन्स, केकेसी कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव (प्रथम), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (द्वितीय), मु.जे.महाविद्यालय,जळगाव (तृतीय)

5. मेहंदी:- पूज्य सानेगुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ फार्मसी, शहादा (प्रथम), आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरपूर (द्वितीय), आर.सी.पटेल शिक्षणशास्त्र महाविद्यालय, शिरपूर (तृतीय)

6. फोटोग्राफी:- पी.टी.सी. एज्युकेशन सोसायटीचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा (प्रथम), पूज्य सानेगुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ फार्मसी, शहादा (द्वितीय), कै. अण्णासाहेब आर.डी.देवरे कला व विज्ञान महाविद्यालय, म्हसदी (तृतीय)

7. पोस्टर मेकींग:- मु.जे. महाविद्यालय, जळगाव (प्रथम), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (द्वितीय), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (तृतीय)

8. रांगोळी:- जी.एच. रायसोनी इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड बिझीनेस मॅनेजमेंट, जळगाव (प्रथम), आर.सी.पटेल इन्स्टीटयुट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च,शिरपूर (जि. धुळे) (द्वितीय), कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, कुऱ्हा कोकोडा (तृतीय)

9. स्पॉट पेंटिग:- प्रताप महाविद्यालय, अमळनेर (प्रथम), मु.जे.महाविद्यालय,जळगाव(व्दितीय), किसान कल, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,पारोळा (तृतीय)

पथसंचलन स्पर्धा विजेतेपद
१. प्रथम : एस.टी. को-ऑप एज्युकेशन सासोयटी लि. सायन्स सिनीयर कॉलेज, शहादा
२. द्वितीय (विभागून) : बी.पी.आर्टस, एसएमए सायन्स, केकेसी कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव आणि लेवा एज्युकेशन युनियनचे जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव
३. तृतीय : ए.आर.बी. गरूड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शेंदुर्णी

कलाप्रकार निहाय विजेतेपद
१. संगीत गट : मु.जे.महाविद्यालय,जळगाव
२. नृत्य गट (विभागून) : प्रताप महाविद्यालय, अमळनेर आणि मु.जे.महाविद्यालय,जळगाव
३. साहित्य कला गट : विद्यावर्धिनी संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धुळे
४. नाट्य गट : मु.जे.महाविद्यालय,जळगाव
५. ललित कला गट : मु.जे.महाविद्यालय,जळगाव

जिल्हानिहाय प्रोत्साहनपर फिरतेचषक
जळगाव जिल्हा (डॉ.अरविंद चौधरी पुरस्कृत स्व.वसुंधरा चौधरी फिरता चषक ) :
महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, चोपडा
धुळे जिल्हा (प्रा.मुक्ता महाजन पुरस्कृत स्व.शांताबाई महाजन फिरता चषक ) : विद्यावर्धिनी संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धुळे
नंदुरबार जिल्हा (प्रा.सुनील कुलकर्णी पुरस्कृत स्व.बाबुराव कुलकर्णी देशगव्हाणकर फिरता चषक )
पू.सा.गु.वि.प्र.मंडळाचे कॉलेज ऑफ फार्मसी, शहादा

सर्वसाधारण विजेतेपद
विजेता : के.सी.ई. सोसायटीचे मु.जे.महाविद्यालय, जळगाव (डॉ. जी.डी.बेंडाळे स्मृती चषक)
उपविजेता : प्रताप महाविद्यालय, अमळनेर (कै.कुसुमताई मधुकरराव चौधरी चषक)

बातमी शेअर करा..!
Previous Post

बेपत्ता महिलांच्या मुद्दावरून शरद पवार शिंदे-फडणवीस सरकारवर कडाकडले

Next Post

भगवान विष्णूच्या आशीर्वादाने या राशींना मिळणार आर्थिक लाभ, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राशिभविष्य, मंगळवार – १४ जून २०२३

भगवान विष्णूच्या आशीर्वादाने या राशींना मिळणार आर्थिक लाभ, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
विरोधकांना झटका! नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

सुप्रीम कोर्टाने राज्‍य सरकारची ‘ती’ मागणी फेटाळत निवडणूक घेण्यास दिला नकार

February 23, 2026
अजितदादांवरील आरोपांचे गाठोडे…विधानसभेत रोहित पवारांची सर्वात मोठी मागणी

अजितदादांवरील आरोपांचे गाठोडे…विधानसभेत रोहित पवारांची सर्वात मोठी मागणी

February 23, 2026
केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा आढावा

केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा आढावा

February 23, 2026
.. तर महायुतीत सहभागी होणार नाही; अजितदादा गटाच्या इशाऱ्याने महायुतीमधील नाराजी थेट चव्हाट्यावर

एकनाथ शिंदेंच्या आणखी एका महत्त्वाकांक्षी योजनेला ब्रेक ; सरकारच्या निर्णयाने खळबळ

February 23, 2026

Recent News

विरोधकांना झटका! नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

सुप्रीम कोर्टाने राज्‍य सरकारची ‘ती’ मागणी फेटाळत निवडणूक घेण्यास दिला नकार

February 23, 2026
अजितदादांवरील आरोपांचे गाठोडे…विधानसभेत रोहित पवारांची सर्वात मोठी मागणी

अजितदादांवरील आरोपांचे गाठोडे…विधानसभेत रोहित पवारांची सर्वात मोठी मागणी

February 23, 2026
केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा आढावा

केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा आढावा

February 23, 2026
.. तर महायुतीत सहभागी होणार नाही; अजितदादा गटाच्या इशाऱ्याने महायुतीमधील नाराजी थेट चव्हाट्यावर

एकनाथ शिंदेंच्या आणखी एका महत्त्वाकांक्षी योजनेला ब्रेक ; सरकारच्या निर्णयाने खळबळ

February 23, 2026
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914