मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नक्षलवाद्यांच्या हातून एन्काऊंटर केला जाणार होता, असे धक्कादायक विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
संजय गायकवाड यांनी बुधवारी मीडियाशी संवाद साधला आहे. यावेळी, “एकनाथ शिंदेंना दुसरं काही देणार नव्हते, त्यांना मौत देणार होते. मौत. नक्षलवाद्यांच्या हातून त्यांचा एन्काऊंटर करणार होते. त्यामुळे त्यांचे संरक्षण काढले होते. मुख्यमंत्र्यांना नक्षलींच्या ताब्यात देऊन हत्या घडवून आणण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. मी मोठा गौप्यस्फोट करत आहे. जबाबदारीने हा गौप्यस्फोट करत आहे”, असा दावा संजय गायकवाड यांनी केला आहे.
याचबरोबर, “एकनाथ शिंदे गडचिरोली पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती. त्यावेळी शिंदे यांना झेडप्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शंभुराजे देसाई गृहमंत्री होते. त्यांच्या घरी बैठक सुरू होती. त्यावेळी मातोश्रीवरून फोन आला आणि एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देऊ नका, असे सांगण्यात आले. याचा अर्थ काय? तुम्ही त्यांना मारण्यासाठी टपले होते. त्यांना नक्षलींच्या हातून मारायचे होते. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेंना सुरक्षा नाकारली,” असा दावा संजय गायकवाड यांनी केला आहे.















Discussion about this post