मुंबई : महाराष्ट्रासह देशातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून अनेक राज्यांमध्ये परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. दरम्यान, महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पुढील 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभाग (IMD)नं वर्तविला आहे. त्याचबरोबर उर्वरित भागात हवामान निरभ्र राहील.
देशातील पावसाचे प्रमाण हळूहळू कमी होत असून येत्या काही दिवसांत देशातून मान्सून पूर्णपणे माघार घेईल. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, आज देशाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या राज्यांना इशारा?
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजनुसार, पुढील 48 तासांत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिसा, कर्नाटक, तामिळनाडूसह महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल. पुढील दोन ते तीन दिवसांत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र, दक्षिण-पश्चिम मान्सूनची पूर्णपणे माघार घेईल.
Discussion about this post