नागपूर । नागपूर विभागातील राजानंदगाव ते कळमना दरम्यान तिसऱ्या मार्गाच्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. हे काम 7 ते 10 ऑक्टोबर दरम्यान चालणार आहे. यामुळे हावडा- मुंबई मार्गावरील मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर अशा एकूण 35 गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
मागील महिनाभरापासून रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक आधीच बिघडले आहे. आता तिसऱ्या लाईनसाठी 35 वर गाड्या रद्द केल्याने प्रवाशांच्या त्रासात आणखी भर पडली आहे. कोणत्या गाड्या रद्द झाल्या आहेत त्याची लिस्ट पाहुया
रेल्वे विभागाने दुर्ग-गोंदिया मेमू पॅसेंजर 11 ते 13 ऑक्टोबरपर्यंत रद्द
गोंदिया-दुर्ग मेमू 12 ते 14 ऑक्टोबरपर्यंत रद्द
इतरवारी- रामटेक मेमू 10 ते 13 ऑक्टोबरपर्यंत रद्द
रायपूर-डोंगरगड, गोंदिया-रायपूर मेमू 10 ते 13 ऑक्टोबरपर्यंत रद्द
बालाघाट-रायपूर, गोंदिया-डोंगरगड मेमू ही गाडी सुद्धा 11 ते 14 ऑक्टोबरपर्यंत रद्द
बिलासपूर-रायपूर इंटरसिटी एक्स्प्रेस 9 ते 14 ऑक्टोबरपर्यंत रद्द
भुनेश्वर कुर्ला एक्स्प्रेस 9 ऑक्टोबर रोजी रद्द
सिकंदराबाद-रायपूर एक्स्प्रेस 11 ते 13 ऑक्टोबर दरम्यान रद्द
रायपूर-सिकंदराबाद ही 12 ते 14 ऑक्टोबर दरम्यान रद्द
बिलासपूर-पुणे व पुणे-बिलासपूर ही गाडी 12 व 13 ऑक्टोबरपर्यंत रद्द
Discussion about this post