मुंबई । देशभरात मागील दीड ते दोन वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे आहेत. असं असले तरी देशात अद्यापही पेट्रोल शंभर रुपयावर विकलं जात आहे. तर डिझेल ९५ रुपयांवर विकलं जात आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाली असून मात्र देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर याचा कोणताही परिणाम नसल्याचं दिसून आलं आहे. आज सकाळी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी झाले. यानुसार पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
सरकारी तेल कंपन्या रोज सकाळी देशातील तेल कंपन्या नवीन पेट्रोल डिझेलचे दर जाहीर करतात. या दरात फारसा फरक झाला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत WTI क्रूड प्रति बॅरल 82.79 डॉलरने विकले जात आहे तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 85.58 डॉलर आहे. मात्र मागील अनेक महिन्यांपासून पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत.
महानगरातील पेट्रोल डिझेलचे भाव
देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत फारसा बदल झालेला नाहीये.
मुंबई
पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
दिल्ली
पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर/ डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
कोलकत्ता
पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर/ डिझेल 92.76 प्रति लिटर
चैन्नई
पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
Discussion about this post