अमळनेर । अमळनेर तालुक्यातून अत्याचाराची एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 14 वर्षे अल्पवयीन मुलीला तिच्या लहान भावाला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार येथे उघडकीस आला असून एका 20 वर्षीय तरुणाविरुद्ध अमळनेरर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
शहरातील पहिला भागात राहणारा विशाल बाबुराव कोळी वय वर्ष 20 राहणार वर्णेश्वर झोपडपट्टी पैलाड अमळनेर याने गेल्या तीन महिन्यापासून पीडित मुलीच्या घराच्या दरवाजाच्या बाहेरून रात्री घरात येऊन लहान भावाला जीव मारण्याची धमकी देऊन पीडितांचे तोंड दाबून तिच्या घराच्या खोली जवळ असणाऱ्या मोकळ्या जागेत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याची घटना 13 जुलै 2023 ते 17 सप्टेंबर 2023 च्या दरम्यान रात्री बारा वाजे नंतर घडले.
या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहे..
Discussion about this post