भुसावळ । भुसावळ तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार करण्यात आला. इतकेच नाही तर परिवाराला त्रास देण्याची धमकीही दिल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी संशयीताला अटक करण्यात आले असून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. यापूर्वी २०१९ ते आतापर्यंत पीडित मुलगी ही अल्पवयीन असताना तिला लग्नाचे आमिष दाखवत त्याच गावात राहणारा रुपेश मंगल पाटील याने तिच्यावर अत्याचार केला. तसेच तू माझ्यासोबत नाही आली तर तुझ्या घरच्या लोकांना त्रास देईल अशी धमकी दिली.
त्यामुळे तिने हा प्रकार घरच्यांना सांगितला नाही. दरम्यान २ ऑगस्ट रोजी हा प्रकार तिला असह्य झाल्याने आपल्यावर झालेली आपबिती तिने घरच्यांना सांगितला. त्यानुसार तिच्यासह नातेवाईकांनी बुधवार २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी रुपेश मंगल पाटील यांच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णा पिंगळे करीत आहे.
Discussion about this post