भुसावळ : भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसबाबत एक मोठी बातमी समोर आलीय. ती म्हणेज उद्या म्हणजेच 20 मे 2023 ते 19 जून 2023 या कालावधीत भुसावळ-पुणे एक्सप्रेस रद्द करण्यात आलेली असून ही गाडी एक महिन्यासाठी केवळ ईगतपुरीपर्यंतच धावणार आहे. यामुळे जळगाव व नाशिक कडून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची मात्र चांगलीच गैरसोय होणार आहे.
विशेष म्हणजे या गाडीला मेमूचे रॅक जोडण्यात येणार असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. भुसावळ येथून रात्री 12.30 वाजता सुटणारी ही गाडी रात्री त्याच वेळी सुटणार आहे. मात्र ही गाडी फक्त ईगतपुरीपर्यतच चालविली जाणार आहे. ईगतपुरीच्या पुढे कल्याण, पनवेल, लोणावळा, पुण्यासाठी ही गाडी चालविली जाणार नाही. ईगतपुरीच ही गाडी दिवसभर थांबून परतीच्या वेळेत तेथून सुटून रात्री भुसावळ येथे परत येणार आहे.
यापूर्वी ही गाडी 28 जानेवारी 2023 ते 1 एप्रिल 2023 या दोन महिन्याच्या कालावधीत कर्जत स्थानकावर यार्ड रिमोल्डिंगच्या कामामुळे ही गाडी भुसावळ ते पुणे दरम्यान रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आता एक महिन्यासाठी इगतपुरी ते पुणे दरम्यान ही गाडी रद्द करण्यात आली आहे. भुसावळ ते इगतपुरीपर्यंतच ही गाडी धावणार आहे. मात्र, यामुळे खान्देश व नाशिक कडून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची मात्र गैरसोय होणार असून प्रवाशांनी रेल्वे प्रशासनात सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे विभागाने केली आहे.















Discussion about this post