जळगाव । जळगावच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरवाढीचा सिलसिला कायम असून, आज बाजार सुरू होताच दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली. सोन्याच्या दरात प्रतितोळा १ हजार २०० रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रतिकिलो २ हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे खरेदीदारांना पुन्हा महागाईचा झटका बसला आहे.
आजच्या दरवाढीनंतर जळगावमध्ये सोन्याचा भाव १ लाख २६ हजार ८०० रुपये प्रतितोळा, तर चांदीचा दर १ लाख ५८ हजार रुपये प्रतिकिलो इतका झाला आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून, आजही ही तेजी कायम राहिली आहे.
लग्नसराईतील खरेदी महागणार
सोन्याच्या दरात सलग वाढ होत असल्याने लग्नसराई आणि इतर शुभकार्यांसाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे. चांदीच्या दरातही वाढ झाल्याने चांदीचे दागिने आणि वस्तू खरेदी करणाऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
गेल्या काही दिवसांतील दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, आगामी काळात सोन्या-चांदीचे भाव आणखी वाढणार की त्यात घसरण होणार, याकडे सराफा बाजारासह ग्राहकांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post