कृषी क्षेत्रातील पदवीधरांसाठी सरकारी संस्थेत नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्ड (NABARD) येथे ज्युनियर आणि सिनियर प्रोजेक्ट असोसिएट पदांच्या एकूण २४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर २०२६ आहे.
या भरतीअंतर्गत ज्युनियर प्रोजेक्ट असोसिएट पदाच्या २१ जागा, तर सिनियर प्रोजेक्ट असोसिएट पदाच्या ३ जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
ज्युनियर प्रोजेक्ट असोसिएट पदासाठी कृषी विषयातील किमान ५० टक्के गुणांसह पदवी आणि १ ते ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. तर सिनियर प्रोजेक्ट असोसिएट पदासाठी कृषी विषयातील किमान ५० टक्के गुणांसह पदवी आणि ३ ते ५ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क
१ ऑक्टोबर २०२६ रोजी उमेदवारांचे वय २४ ते ४५ वर्षांच्या दरम्यान असावे. अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांना ५ वर्षे, तर इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षांची वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क खुल्या आणि ओबीसी प्रवर्गासाठी ८५० रुपये, तर एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी १५० रुपये आहे.
अर्ज कसा कराल?
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई किंवा देशातील विविध ठिकाणी काम करण्याची संधी मिळू शकते. परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.














Discussion about this post