Tuesday, November 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महापरिनिर्वाण दिनासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! नागपूर-अमरावतीहून मुंबईसाठी ११ विशेष गाड्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 24, 2026
in जळगाव जिल्हा
0
मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; महापरिनिर्वाण दिनानिमित्त 15 विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा
बातमी शेअर करा..!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या अनुयायांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नागपूर आणि अमरावती येथून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत एकूण ११ अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, या गाड्यांना भुसावळ, जळगाव आणि चाळीसगाव स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे खानदेशातील आंबेडकरी अनुयायांसह प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नागपूर-मुंबईदरम्यान विशेष गाड्यांचे वेळापत्रक

नागपूरहून मुंबईकडे जाण्यासाठी चार विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

गाडी क्रमांक ०१२६० : ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.१० वाजता नागपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १०.५५ वाजता मुंबईला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१२६२ : ४ डिसेंबर रोजी रात्री ११.५५ वाजता नागपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी ४.१५ वाजता मुंबईला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१२६४ : ५ डिसेंबर रोजी सकाळी ७.४० वाजता नागपूरहून सुटून त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता मुंबईला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१२६६ : ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.१० वाजता नागपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १०.५५ वाजता मुंबईला पोहोचेल.

मुंबईहून नागपूरसाठी पाच विशेष गाड्या

मुंबईहून नागपूरकडे परतण्यासाठीही पाच विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

गाडी क्रमांक ०१२४९ : ६ डिसेंबर रोजी रात्री ८.२५ वाजता मुंबईहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२० वाजता नागपूरला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१२५३ : ७ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.४० वाजता दादरहून सुटून त्याच दिवशी सायंकाळी ४.१० वाजता नागपूरला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१२५१ : ७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबईहून सुटून दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.५५ वाजता नागपूरला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१२५५ : ७ डिसेंबर रोजी दुपारी १२.३५ वाजता मुंबईहून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता नागपूरला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१२५७ : ८ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.२५ वाजता मुंबईहून सुटून त्याच दिवशी सायंकाळी ४.१० वाजता नागपूरला पोहोचेल.

या सर्व गाड्यांना अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

अमरावती-मुंबईसाठीही दोन विशेष गाड्या

अमरावतीहून मुंबईला जाणाऱ्या आणि परतीच्या प्रवाशांसाठीही दोन विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. या गाड्यांना पाचोरा स्थानकावरही थांबा देण्यात आला आहे.

गाडी क्रमांक ०१२१८ : ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजता अमरावतीहून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२५ वाजता मुंबईला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१२१७ : ७ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.४० वाजता मुंबईहून सुटून त्याच दिवशी दुपारी १२.५० वाजता अमरावतीला पोहोचेल.

या गाड्यांना बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि दादर येथे थांबे असतील.

सर्व डबे जनरल; वैध तिकीट घेऊनच प्रवास करा

या सर्व विशेष रेल्वे गाड्यांना १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे (जनरल) डबे आणि २ गार्ड ब्रेक व्हॅन असणार आहेत. त्यामुळे या गाड्यांमधून प्रवासासाठी अनारक्षित तिकीट उपलब्ध असेल. प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी वैध तिकीट काढावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शरणकुमार लिंबाळे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; महापरिनिर्वाण दिनानिमित्त 15 विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा

महापरिनिर्वाण दिनासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! नागपूर-अमरावतीहून मुंबईसाठी ११ विशेष गाड्या

November 24, 2026
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शरणकुमार लिंबाळे

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शरणकुमार लिंबाळे

November 24, 2026
भारतीय सैन्यात २ लाखांहून अधिक पगाराच्या नोकरीची संधी.. या पदांवर निघाली भरती

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात १,१६७ जागांसाठी भरती; पदवी पास तरुणांना संधी

November 24, 2026
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी; नेमका कसा असणार कार्यक्रम?

राजीव गांधींच्या हत्येप्रकरणी राहुल गांधींचा खळबळजनक दावा ; काय म्हणाले..

November 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page