जळगाव : एकीकडे कर्जफेडीची चिंता आणि दुसरीकडे दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या दिव्यांग शेतकऱ्याने आत्महत्या केली. गजानन पद्माकर पाटील (४८, रा. विदगाव, ता. जळगाव) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना २१ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिव्यांग असतानाही गजानन पाटील हे जिद्दीने शेती करून उदरनिर्वाह करत होते. शेतीसाठी त्यांनी कर्ज घेतले होते. कर्जफेडीची चिंता सतावत असतानाच यंदा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.
या आर्थिक विवंचनेतून त्यांनी रात्रीच्या वेळी राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.














Discussion about this post