सरकारी क्षेत्रात अप्रेंटिसशिपची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अर्थात ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) मध्ये विविध ट्रेड आणि शाखांमधील एकूण ३ हजार ४७ अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यामध्ये ट्रेड अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, अर्जाच्या मुदतीबाबत ONGC ने सुधारित सूचना जारी केली असून NAPS पोर्टलवरील अर्जाची अंतिम तारीख २९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
या भरतीसाठी १०वी, १२वी, ITI, डिप्लोमा तसेच पदवीधर उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार संधी उपलब्ध आहे. देशातील २४ कार्यकेंद्रांवर ही अप्रेंटिसशिप भरती होणार आहे.
पदांचा तपशील
ONGC च्या या भरतीमध्ये ट्रेड अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस अशा विविध प्रकारच्या पदांचा समावेश आहे. उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार संबंधित ट्रेड किंवा शाखेसाठी अर्ज करता येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
१. ट्रेड अप्रेंटिस : संबंधित पदानुसार १०वी किंवा १२वी उत्तीर्ण अथवा संबंधित ट्रेडमधील ITI आवश्यक आहे. यामध्ये COPA, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशीनिस्ट, मेकॅनिक मोटार व्हेईकल, डिझेल मेकॅनिक, मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन (पॅथॉलॉजी), रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, स्टेनोग्राफी (इंग्रजी), सर्व्हेअर आणि वेल्डर यांसारख्या ट्रेडचा समावेश आहे.
२. पदवीधर अप्रेंटिस : संबंधित पदानुसार B.A., B.Com., B.Sc., B.B.A., B.E. किंवा B.Tech पदवी आवश्यक आहे. काही पदांसाठी विशिष्ट विषयातील पदवीची अट आहे.
३. डिप्लोमा अप्रेंटिस : संबंधित इंजिनिअरिंग शाखेतील तीन वर्षांचा डिप्लोमा आवश्यक आहे. यामध्ये कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन आणि मेकॅनिकल शाखांचा समावेश आहे.
वयोमर्यादा
२९ नोव्हेंबर २०२६ रोजी उमेदवाराचे वय १८ ते २४ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत ५ वर्षे, तर इतर मागासवर्गीय (OBC-NCL) उमेदवारांना ३ वर्षांची सूट देण्यात येणार आहे. दिव्यांग उमेदवारांसाठीही नियमानुसार वयोमर्यादेत सवलत लागू आहे.
किती मिळणार विद्यावेतन?
अप्रेंटिसशिप प्रशिक्षणाचा कालावधी १२ महिने आहे. प्रशिक्षणादरम्यान पात्रतेनुसार दरमहा विद्यावेतन दिले जाणार आहे.
पदवीधर अप्रेंटिस : १२,३०० रुपये
तीन वर्षांचा डिप्लोमा : १०,९०० रुपये
१०वी/१२वी पात्रता असलेले ट्रेड अप्रेंटिस : ८,२०० रुपये
एक वर्ष ITI ट्रेड : ९,६०० रुपये
दोन वर्ष ITI ट्रेड : १०,५६० रुपये
अर्ज कसा कराल?
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी संबंधित पदानुसार NAPS किंवा NATS पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करून अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचून पात्रता, कार्यकेंद्र आणि संबंधित ट्रेडची माहिती तपासावी. एका उमेदवाराला एका कार्यकेंद्रासाठी आणि एका ट्रेडसाठीच अर्ज करता येईल. संबंधित कार्यकेंद्रासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या जिल्ह्यातील रहिवासी असणे किंवा तेथून आवश्यक शैक्षणिक पात्रता प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क : कोणतेही शुल्क नाही.
निवड प्रक्रिया : पात्रता तपासणीनंतर संबंधित परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. त्यानंतर कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया होईल.
अधिकृत संकेतस्थळ : www.ongcindia.com














Discussion about this post