जळगाव । संपूर्ण देशात आज दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत असून, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू आहे. अशातच जळगावच्या सराफ बाजारातून ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून, सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ३ हजार ७०० रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रति किलो ९ हजार रुपयांची घट झाली आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी अनेक नागरिक दागिने, नाणी तसेच चांदीच्या वस्तू खरेदी करण्याला प्राधान्य देतात. यंदा खरेदीच्या मुहूर्तावरच दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
जळगावच्या सराफ बाजारात ६ नोव्हेंबर रोजी जीएसटीसह १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ४५ हजार ५३९ रुपयांवर आला आहे. तर एक किलो चांदीचा दर जीएसटीसह १ लाख ९१ हजार ५८० रुपये झाला आहे. सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या या घसरणीमुळे धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळाली आहे.
दिवाळीच्या काळात सोने-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू असताना आज झालेल्या मोठ्या घसरणीमुळे सराफ बाजारात ग्राहकांची खरेदी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.















Discussion about this post